Sunday, January 12, 2020

अनुराधा पाटील या कवयित्रीला मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्तानं लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत आलेली   त्यांची
मुलाखत - 

मुलाखत कवयित्रीच्या सृजनात्मक प्रवासाकडे कमी आणि स्त्रीला साहित्यविश्वात मिळणारी  सापत्न वागणूक, स्त्रीवादी कलाकृती
याभोवती अधिक फिरते.

स्त्रीवाद हा साहित्य कृतीतून अट्टहासानी अधोरेखित करण्याची गोष्ट  आहे का? तुम्ही स्वतः स्त्री असूनही जर तुम्ही  तुमची कलाकृती
'agender'  ठेवण्याचे धोरण स्वीकारलेत तर त्याद्वारे  साहित्यातील पुरुषप्रधान अपवृत्तीला तुम्ही अनुल्लेखाने मारल्यासारखेच नाही
का होणार!

आता आपली कलाकृती 'agender' ठेवायची म्हणजे काय ? तर तुमच्या कलाकृतीचा सर्व माणसांना irrespective_of  gender
समान रसास्वाद घेता यावा.

शांता शेळके, दुर्गा भागवत, इंदिरा संत, इरावती कर्वे यांनी असा स्वतंत्र स्त्रीवादाचा झेंडा न फडकावताही रसिकांच्या मनात न पुसता
येणारे स्थान निर्माण केले. पण म्हणून त्यांच्या लिखाणात स्त्रीच्या  मनो-भावविश्वाचा उल्लेख नव्हता का? तो होताच!
पण कुठल्याही अभिनिवेशाशिवाय.

स्वाती गोखले 
ठाणे

No comments:

Post a Comment