अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।। ..... ......
ही ज्ञानेश्वर माउलींची सुप्रसिद्ध विरहिणी आहे.
ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या 'विराणी' त (विरहिणीत) त्या शुद्ध चैतन्याची भेट व्हावी याची आर्तता भरून राहिली आहे. आणि मग शेवटी तो 'सावळा सुंदर' तिला भेटतो आणि तिला अद्वैताचा साक्षात्कार होतो.
या 'अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ' चा अनुभव जसा त्या विराणीतील गोपिकेला आला तसा आपल्यालाही येत असतो. फक्त आपण जाणवून घेतोच असं नाही.
साहित्य वाचताना अनेकदा सारस्वताचे घबाडचं हाती लागल्यासारखे वाटते आणि ज्ञानाचा महासागर त्या पुस्तकातून आपल्याकडे उसळून येऊ पाहतोय असे वाटते. तो ज्ञानाचा, माहितीचा जोर बुद्धीला सहन होत नाही. अशा वेळी मी पुस्तक मिटून घेते आणि सद्गदित होते. मनात म्हणते, "हो बाबा, मी वाचणार आहे तुला, पण हळू हळू. तुझं विश्वरूप सोडून मला सामोरा ये पाहू! तुझं सौम्य असं मानवी रूप मला झेपेल, पेलेल. " या ठिकाणी मला खचितच हा अळुमाळु परिमळू पसरविणारा तो हजर असल्याचा भास होतो.
अंजली दाबके

सारस्वताचे घबाड....सुंदर.
ReplyDeleteतुझं विश्र्वरूप सोडून मला सामोरा ये पाहू...सुंदर
वाचकाला असे उत्कट "आडवाटेलाच" गवसतात, वर्दळीच्य हम रस्त्यावर नाही
*क्षण
ReplyDelete